Tanga Palti
  • होम
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शेती
No Result
View All Result
Tanga Palti
  • होम
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शेती
No Result
View All Result
Tanga Palti
No Result
View All Result

‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा हा भाग ; शिवसेनेची खरपूस टीका

Team Tanga Palti by Team Tanga Palti
February 26, 2021
in महाराष्ट्र, राजकारण
0
shivsena slam narendra modi over stadium name changed
Share on WhatsAppFacebookTwitterTelegram
Join WhatsApp Group

गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियमच नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम अस केल्यानंतर भाजप विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. सरदार पटेल यांच नाव पुसल्याचा आरोप विरोधक करत असताना आता शिवसेनेने देखील आपल्या सामना अग्रलेखातुन मोदी सरकार वर टीकेचे बाण सोडले आहेत. नरेंद्र मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता? हा बदल त्यांच्या गुजरातच्या जनतेने स्वीकारला आहे. सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे, उद्या नेताजी बोसही संपतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता. आता ‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा हा भाग आहे, अशी खरपूस टीका आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे.

काय म्हटलं आहे अग्रलेखात –
काँग्रेसने अपमानित केलेल्या सरदारांचा मानसन्मान, उंची वाढविणारा गुजरातमधील सरदार पटेल यांचा पुतळा असल्याचे मोदी यांच्याकडून सांगण्यात आले. पटेल यांचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न काँग्रेस किंवा नेहरू-गांधी घराण्याने केला असे गेल्या पाचेक वर्षांत अनेकदा सांगण्यात आले, पण गुजरातमधील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून ते मोदी स्टेडियम करावे असे काही सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी सुचविल्याचे दिसत नाही. पटेल यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न नक्की कोण करीत आहे, ते यानिमित्ताने दिसले.

मोदी हे महान आहेतच. त्याविषयी शंका घेण्याचे कारण नाही, पण मोदी सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्यापेक्षाही महान आहेत असे मोदी भक्तांना वाटत असेल तर त्यास अंधभक्तीची पुढची पायरी मानावी लागेल.

मोदींना सरदार पटेलांचे कालपर्यंत गुणगान गाणारे हे लोक एका स्टेडियमच्या नावासाठी सरदारविरोधी होतात, हा निव्वळ व्यापार म्हणावा लागेल. उद्या प. बंगालात सत्तांतर झाले तर (शक्यता अजिबात नाही) नेताजी बोस यांच्या नावे असलेल्या संस्थांची नावेही बदलली जातील अशी भीती लोकांना वाटू लागली आहे. सरदार पटेल हे काही फक्त गुजरातचे पुढारी नव्हते. गांधी-नेहरूंप्रमाणे ते देशाचे आदर्श होते व आहेत, पण सरदार पटेलांचे कोणते आदर्श या सरकारने पाळले? असा सवाल सामनातून केला आहे.

Tags: Narendra ModiSanjay Rautनरेंद्र मोदीसंजय राऊतस्टेडियम
SendShareTweetShare
Previous Post

व्यापाऱ्यांचा आज ‘भारत बंद ; जाणून घ्या कोणत्या सेवा बंद राहणार?

Next Post

सर्वसामान्यांना आणखी एक झटका ; गॅस सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या

Next Post
Gas

सर्वसामान्यांना आणखी एक झटका ; गॅस सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संचारबंदीच्या निर्णयावर राज्यातील जनता समाधानी आहे का?

nora fatehi

नोरा फतेहीचा ‘नदियों पार’ व्हिडीओने चाहते घायाळ; पहा व्हिडीओ

sofia ansari viral photo

सोफिया अन्सारीचा बोल्ड फोटो होतोय व्हायरल; एका दिवसात अडीच लाख लाईक्स

sudhir mungantiwar says impose president rule in maharashtra

…तर राज्यात राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही ; मुनगंटीवार

house being sold italy only 83 rupees

ऐकाव ते नवलच ; ‘या’ श्रीमंत देशात 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत घरं विकतय सरकार

sanjay raut criticizes governor bhagat singh koshyari

…पण मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा”, संजय राऊतांचा राज्यपाल कोश्यारींना टोला

Load More
महाराष्ट्र

संचारबंदीच्या निर्णयावर राज्यातील जनता समाधानी आहे का?

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसाच्या संचारबंदीची घोषणा केली असून अंमलबजावणी सुरु आहे. दरम्यान,...

nora fatehi

नोरा फतेहीचा ‘नदियों पार’ व्हिडीओने चाहते घायाळ; पहा व्हिडीओ

sofia ansari viral photo

सोफिया अन्सारीचा बोल्ड फोटो होतोय व्हायरल; एका दिवसात अडीच लाख लाईक्स

sudhir mungantiwar says impose president rule in maharashtra

…तर राज्यात राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही ; मुनगंटीवार

house being sold italy only 83 rupees

ऐकाव ते नवलच ; ‘या’ श्रीमंत देशात 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत घरं विकतय सरकार

sanjay raut criticizes governor bhagat singh koshyari

…पण मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा”, संजय राऊतांचा राज्यपाल कोश्यारींना टोला

  • Home
  • Sample Page

Tanga Palti © 2020.

No Result
View All Result
  • होम
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शेती

Tanga Palti © 2020.

Join WhatsApp Group